info@devrukhebrahman.com
9819332062 / 9819746867

देवारुख्यांचा इतिहास

देवरुख्यांचा इतिहास गौरवशाली इतिहास

देवरुखे ब्राह्मण, हे "हिंदू ब्राह्मण समुदाय" यापैकी असून पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण विभागातले आहेत. "देवरुखे" यांची गणना महाराष्ट्राच्या ब्राह्मणापैकी चार मुख्य शाखात होते. अर्थात अन्य शाखा म्हणजे देशस्थ, चितपावन, कऱ्हाडे. महाराष्ट्रीयन ब्राह्मण हे पंचद्रविड ब्राह्मणापैकी आहे. पंचद्रविड ब्राह्मणाच्या अन्य प्रशाखा तमिळ, तेलंगी, कर्नाटकी व गुजराती या होत. देवरुखे ब्राह्मण शाकाहारी असतात. देवरुखे ब्राह्मणांसाठी १९३१ आणि १९६१ साली जनगणना करण्यात आली होती. १९६१ सालच्या जणगणने प्रमाणे देवरुखे ब्राह्मणांची संख्या एकूण १५००० होती. सध्या हि संख्या २५-३०००० असण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनसंख्येकडे बघता हा आकडा शून्यातच गणला जाऊ शकतो. या करणामुळे देवरुखे ब्राह्मण, आपली समृद्ध परंपरा आणि अस्तित्व असूनही महाराष्ट्र राज्यांत आपले हवे तसे स्थान मिळवण्यास असमर्थ राहिले. दोन्ही वेळेच्या जनगणना सिद्ध करतात कि देवृखे ब्राह्मणांची साक्षरता टक्केवारी ९४ टक्के असून यांत स्त्री साक्षरता ८५ टक्के आहे. जीवनमर्यादा प्रमाण सुद्धा राष्ट्रीय प्रमाणांहून जास्त आहे. व्यवसाय दृष्ट्या मुख्यतः रेव्हेन्यू कलेक्टर, शेतकरी, लहान मोठा व्यवसाय असलेले. आपापल्या समुदायांत पौरोहित्य करणारे ब्राह्मण, आचारी, असलेले आढळत. या प्रमाणे यांची गणना कनिष्ठ मध्याम्वार्गांत केली जात असे.

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व

आरंभ विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख "जाती पुरण" मध्ये येतो. पुढील ग्रंथात यांचा उल्लेख आहे, विश्वदर्श ग्रंथ ज्ञातीप्रमुख. ज्ञातीदिपिका इत्यादी (संदर्भ पीपल ऑफ इंडिया, पॉप्युलर प्रकाशन तर्फे दोन खंडांमध्ये प्रकाशित द anthropological सर्वे ऑफ इंडिया. वर्ष: २००४, आईएसबीएन : भाग १ : ८१-७९९१-१००-४, भाग २ : ८१-७९९१-१०१-२, पृष्ठ ४७४ पासून ४९०.) देवरुखे ब्राह्मणांच्या मूळ स्थितीबद्दल खात्रीलायक माहिती प्राप्त नाही. सगळ्यात आधीच्या संदर्भात देवारुख्याविषयी जो संदर्भ आढळतो, तो "शत प्रश्न कल्पलता" या धर्मग्रंथात. देवरुखे ब्राह्मणांची उत्पत् असणारे देवरुख गावाचे राहणारे आणि बासनी गावांतून पुढे जाणारे होते) यातील काही सामाजिक तरीही कर्तृत्वा विषयी झालेला विवाद आहे तेव्हापासून या गटांतील ब्राह्मणांना देवरुखे ब्राह्मण म्हटले गेले. तरीही ही गोष्ट देवरुखे ब्राह्मणांच्या उत्पत्ती विषयी पुरावा म्हणून पुढे आलेला नाही. या कारणामुळे देवरुखे नावाची एक पोटजात नावारूपाला आली एवढेच. महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गाव आणि संगमेश्वर तालुका येथील वस्तीमुळे ते देवरुखे म्हणून गणले जात असावे असे वाटते. महाराष्ट्रीयन ब्राह्मणांची अनेक गोत्रात विभागणी झालेली आहे. देवरुखे ब्राह्मणांची १४ गोत्रे आहेत. काही विद्वात्जानानी या गोत्रापासून हे सिद्ध करण्याचे प्रयत्न केले आहेत कि देवरुखे ब्राह्मण हि पोटजात मुख्यतः कऱ्हाडे केव्हा देशस्थ या जातींतून उत्पन्न झालेली आहे. कारण अर्हडे यांच्यात ११ गोत्रे तर देशस्थांत १४ गोत्रे आहेत. यापुढे हे म्हटले जाते कि कऱ्हाडे सुद्धा, कोकणांत स्थायिक होण्यापूर्वी देशास्थापैकीच होते. देवरुखे ब्राह्मणांच्या प्रमुख कुलदेवता १८ आहेत. बहुतेक मुख्यत्वेकरून शंकराचे उपासक असून "रत्नेश्वर" या कुलदेवतांची उपासना करतात. मार्च १९६६ मध्ये डॉ. कैलाशचंद्र मेहरोत्रा यांनी पुणे विश्वविद्यालयाची पीएचडी डिग्री करताना "महाराष्ट्रीयन ब्राह्मणांची ऑथ्रोपोमीटिक गणना आणि रक्त गट" या विषयी संशोधन करताना डॉ. इरावती कर्वे यांच्या मार्गदर्शनांत पूर्ण केले. त्यांनी दोन गटांत प्रत्येक शंभर मनुष्य या हिशोबाने 8 महाराष्ट्रीयन जातींवर पर्योग केले, या जाती: १ चितपावन. २ देवरुखे, ३ सरस्वत, ४ कऱ्हाडे, ५ देशस्थ, - ऋग्वेदी , ६ काण्व, ७ मध्य्व्रंदिन, ७ चरक. या सगळ्या पोटजातींचे अध्ययन त्यांच्यातील शारीरिक वैशिष्ट्ये आणि रक्त गटांप्रमाणे केल्यावर डॉ. मेहरोत्रा यांनी असा निष्कर्ष काढला कि परतेक जातीची उत्पत्ती विशिष्ट व एकमेव असून त्यांचा आपसांत काही एक संबंध नाही. देशस्थ - ऋग्वेदी, माध्य्व्रंदिन, कण्व आणि देवारुखे यांच्यात उत्पत्ती विषयी साम्य असू शकते. परंतु या विषयाला पूर्ण पणे बघितल्यास असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल कि या आठ जातींची उत्पत्ती एकाच आहे. देवरुखे ब्राह्मण परिश्रमी, अगत्यशील. सौम्य, आणि काटकसरी असतात. ते मनमिळावू असतात, विसाव्या शतकापूर्वी हे एक बंदिस्त समूह असे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की देवरुखे ब्राह्मण आपल्या प्रगती साठी स्वयंस्फुर्तपणे पुढे येतात. देवरुखे ब्राह्मणाद्वारे झालेल्या वेगवेगळ्या संस्थांची स्थापना हे दर्शवते, की शिक्षण, वित्त आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पैकीच एक संस्था "विद्यार्थी सहाय्यक संस्था" आपल्या गौरवशाली परंपरेची १०० वर्ष पूर्ण करत आहे.आपल्या जातीची सेवाभावना उच्च कोटीची आहे. या संस्थांच्या मालमत्तांची यादी कोट्यावधी रुपयांत आहे. असे दिसून येते की मुस्लीम लोकांच्या आक्रमणामुळे, शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने देवरुखे ब्राह्मण रत्नागिरी जिल्ह्यातील आंतरिक क्षेत्रात गेले जिथे नदीचे पाणी विपुल प्रमाणात आहे. असे म्हणणे वावगे होणार नाही की देवरुखे ब्राह्मण हे जयगड खाडी आणि शास्त्री नदीच्या बाजूने असलेल्या ९८ गावांमधून वसलेले आहेत. आज देवरुखे ब्राह्मण रायगड आणि रत्नागिरी, मुंबई आणि उपनगरांत, महाराष्ट्राच्या अनेकानेक भागात आणि गुजरात व मध्याप्रदेशांत आहेत. यापैकी काही शिक्षण नोकरीनिमित्त अमेरिका. युके व कॅनडा येथे स्थायिक झाले आहेत. वर्तमान स्थिती: व्यक्तिगत आणि सामुहिक रित्या केलेले संघर्ष आणि सतत प्रयत्नांमुळे आता देवरुखे ब्राह्मण जातीला उत्कर्षाचे आणि प्रगतीचे दिवस दिसत आहेत. साक्षरता टक्केवारी संगणक साक्षरता आणि स्त्री साक्षरता मिळून, या जातीची शैक्षणिक आणि वित्तीय स्थिती अन्य कोणत्याही जातीपेक्षा प्रगतीशील आहे. परिवार नियोजन करणे, आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे व भविष्य सुधारणे यासाठी वित्तीय योजना करणे असे सद्गुण वाखाणण्याजोगे आहेत. या कारणांमुळे यांचे जीवनस्तर कमालीचे उंचावले आहे.