RSS

देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,

दिनांक ८ जानेवारी २०१७ ची सकाळ, डोंबिवली येथील डी एन सी कंपाऊंड, महाराष्ट्र विध्या प्रसारक मंडळ शाळेचे पटांगण रंगीबेरंगी उंची साड्या नेसलेल्या महिलांनी भरून गेले होते. कारण होते देवरुखे ब्राम्हण महिला मेळावा समिती आणि देवरुखे ब्राम्हण अनाथ कौटुंबिक निधी यांच्या संयुक्त विध्यमानाने भरवलेला ५ वा महिला मेळावा. या आधीच्या सर्व मेळाव्याचे रेकॉर्ड तोडत १००५ तिकिटांची विक्री करीत महिलांनी नरी शक्ती चा जागर केला.
 
या मेळाव्याच्या अध्यक्षा प्रसिद्ध उद्योजिका व अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. साधना जुवेकर गंटी (नवी मुंबई) या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. सुनिती कारूळकर (उंबरगाव) या उपस्थित होत्या. बहार आली ती शिरगाव येथील उत्कर्ष महिला मंडळच्या महिलांनी सादर केलेल्या "महाराष्ट्राची लोकधारा " या जबरदस्त कार्यक्रमाने. त्यानंतर अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचे हस्ते महिला मेळाव्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या कल्पक संस्थापकांचा सत्कार केला गेला.
 
समाजात विशेष कामगिरी करणाऱ्या पुढील पाच कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. भारतीय हवाईदलात तांत्रिक विभागात स्कॉड्रन लीडर या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. अक्षदा भोळे दीक्षित, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात HIV संदर्भात जनजागृती करणाऱ्या सौ. मृदुला निंबकर, आजपर्यंत १२५ च्या वर कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव असलेल्या सौ. अंजली मुळ्ये मराठे , Adonis Aviation Enterprises या विमान कंपनीच्या मालकीण व प्रसिद्ध उद्योजिका सौ. लीना जुवेकर दत्तगुप्त , विमा क्षेत्रात २७ वर्षे यशस्वी कारकीर्द असलेल्या सौ. वैशाली भागवत या सत्कारमूर्ती होत्या.
 
देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी तर्फे विश्वस्त डॉ सौ सुनंदा भोळे यांनी संस्थेची थोडक्यात माहिती दिली आणि ज्ञातिबांधवांना या अनाथ कौटुंबिक निधीला मदत करण्यास आवाहन केले. त्यावेळी देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीचे एक आवाहन आणि संस्थेच्या मदतीसाठी सदिच्छा पत्र सर्व उपस्थिताना वाटण्यात आले.
 
वंदिता भोळे आणि अमृता मुकादम या नव्या परंतु दमदार निवेदिकानी सूत्र संचालन केले.
 
मध्यंतरानंतर जिव्हाळा संस्थेतर्फे श्री आनंद मसवेकर दिग्दर्शीत सुनेच्या राशीला सासू या विनोदी नाटकाने प्रेक्षकांचे हसू अनावर झाले.
उत्कृष्ट आयोजन आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाने हा पाचवा मेळावा सुद्धा महिलांच्या लक्षात राहील असा झाला. अत्यंत उत्साही वातावरणात हा मेळावा संपन्न होण्यासाठी अनेक महिलांची या मागे अपार मेहनत होती.
 
देवरुखे ब्राम्हण महिला मेळावा समिती
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
देवरुखे ब्राह्मण महिला मेळावा २०१७,
देवरुखे ब्राह्म...
Detail Download
 
 
Powered by Phoca Gallery