आरोग्य

आरोग्य विषयक घरचा वैद्य
  • अपचन - अन्नपचन योग्य न झाल्यामुळे पोट फुगणे, दुखणे व अस्वस्थता ही लक्षणे असलेल्या विकाराला ‘अपचन’ असे म्हणतात. पचन तंत्रात रचनात्मक बिघाड नसून पचनक्रियेत दोष उत्पन्न झाल्यास ही संज्ञा वापरतात.
  • अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या.
  • पोटात कृमी झाल्यास लसणाच्या ३-४ पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात.
  • घसा बसल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे.
  • रात्री नाक चोंदल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते.
  • घश्यात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एखाद दुसरी काळी मिरी तोंडात ठेवावी.
  • घामोळ्यामुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं. १५ मिनीटानंतर धुवून टाकावं. हा उपचार काही दिवस चालू ठेवावा.
  • उन्हाळ्यात खूप उष्मा वाढू लागल्यास शरीर थंड ठेवण्यासाठी २ ग्लास पाण्यात १ टीस्पून बडीशेप घालून उकळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ काही दिवस घ्यावे.
  • अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात चिमूटभर मीठ घालून प्यावे. यामुळे वेदना थांबून अतिसार काबूत येतो.
  • नागीण किंवा इतर त्वचारोगांवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे तुळस. तुळशीची पाने वाटून किंवा पानाचा रस बाधीत त्वचेवर चोळावे.

डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

दृष्टीदोष

डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.

त्वचारोग

सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.

श्वास खोकला

श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.

अतिसार

काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.

कृमी

लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा. गॅस होणार्‍यास मध व लिंबू रोज द्या, ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.

कफ विकार

खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.

मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही. चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.

पोटाच्या विकारांवर मध

रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात. डोकेदुखी, हातापायास ठणका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते. (लहान मुलास एक चमचा मध देणे.)