सुविचार

ऎकावे जनाचे करावे मनाचे.सुविचार

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.सुविचार

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.सुविचार

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.सुविचार

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.सुविचार

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.सुविचार

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.सुविचार

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.सुविचार

          त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

          आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.सुविचार

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?सुविचार

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !सुविचार

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.सुविचार

नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.सुविचार

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.सुविचार

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.सुविचार

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.सुविचार

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.सुविचार

 

ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत.

बाबासाहेब आंबेडकर

जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.

बाबासाहेब आंबेडकर

केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.

अज्ञात