सन्मित्रा समाचार

देवरुखे ब्राह्मण ज्ञातीती काही दूरदृष्टी असलेल्या बांधवानी सन्मित्र समाचार मंडळातर्फे १५ डिसेंबर १९३५ रोजी सन्मित्र समाचार हे मासिक सुरु केले. हे मासिक सुरु झाल्यावरज्ञातीबंधावानीही समाजातील महत्वाच्या घटना संपादकांना कळवण्यास सुरवात केली. त्यामुळे या मासिकाच्या माध्यमातून सर्व समाजाला या सर्व घटनांची माहिती होऊ लागली व सन्मित्र समाचार खरोखरच सगळ्यांचा चांगला मित्र झाला.

की. गोपाल सीताराम मुळे हे सन्मित्र समाचारचे पहिले संपादक. त्यांनी १९५२ सालापर्यंत म्हणजे जवळजवळ ३७ वर्ष संपादकाचे काम करून सन्मित्र समाचारच भक्कम पाया घातला. त्यांच्या नंतर श्री यादव नारायण मुळे यांनी सन १९५७ पर्यंत व श्री राजाराम गणेश काळे यांनी १९५९ पर्यंत संपादकाची धुरा वाहिली. या नंतर सतत २८ वर्षे आपल्या समाजातील सेवाभावी कार्यकर्ते श्री शंकर गोपाल मादुस्कर यांनी अत्यंत निष्ठेने संपादकपद सांभाळले.

या काळात गो भा उर्फ बाळासाहेब कुळकर्णी यांनी त्यांना सहकार्य केले. त्यानंतर advocate श्री चंद्रकांत यादव मुळे हे संपादक झाले व श्री अविनाश नारायण मुसळे हे त्यांना सहाय्य करीत होते. प्रकृती सुधारल्यावर परत श्री बाळासाहेब कुळकर्णी व श्री चंद्रकांत यादव मुळे यांनी सामाचाराचे काम पहिले. सन १९९४ मध्ये प्रकृती अस्वास्थामुळे श्री बाळासाहेब कुळकर्णी निवृत्त झाले व श्री चंद्रकांत यादव मुळे संपादक व श्री चिंतामण यशवंत महाजन उपसंपादक म्हणून काम पाहू लागले. पुढे श्री चंद्रकांत यादव मुळे हे उपनगरात राहायला गेले व त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी संपादकपदाची जबाबदारी सोडली व १९९६ पासून श्री चिंतामण महाजन यांनी संपादकपदाचा भार उचलला. श्री विजयकुमार लक्ष्मण निमकर यांनी अडीच ते तीन वर्षे त्यांना सहसंपादक म्हणून मदत केली.

श्री चिंतामण यशवंत महाजन हे जुलै २००४ साली संपादकपदावरून निवृत्त झाल्यापासून गेली काही वर्षे एस.एल. and एस.एस. गर्ल्स हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ वृंदा मधुसुधन भागवत या साम्पादिकेचे काम करीत आहेत व सुरवातीचा काही काल निवृत्त मुख्याध्यापिका सौ उल्का वामन काळे या सहसंपादिका होत्या सध्या निवृत्त शिक्षिका सौ स्मिता सुभाष निमकर या सहसंपादिका म्हणून कार्यरत आहेत.

समाचाराची ८३ वर्षाची अखंडित वाटचाल समाजास नक्कीच भूषणास्पद आहे. यास समाजातील विभिन्न क्षेत्रातील निरनिराळ्या व्यक्तींनी केलेली सेवा कारणीभूत आहे. समाचारचे वर्गणीदार, देणगीदार व समस्त ज्ञातीबंधावांचा या कार्यात सहभाग आहे. समाचाराच्या संचालक मंडळाने संपादकांना पूर्ण स्वातंत्र दिले आहे. तसेच समाजविघातक विषयांपासून समाचार नेहमीच दूर राहिला आहे. सध्या समाचाराच्या संचालक मंडळावर ९ पैकी ४ महिला आहेत हे विशेष. तसेच गेल्या ७२ वर्षात समाचार एकही अंकाचा खंड न पडता प्रकाशित होत आहे हे दुसरे विशेष.

समाजच्या उन्नतीसाठी, समाज एकसंध राहण्यासाठी समाजातील सर्व प्रकारच्या महत्वाच्या घटनांचीसमाजबंधावाना माहिती देण्यासाठी व ज्ञान प्रबोधनासाठी समाचाराच्या लेखनात प्रसंगानुरूप बदल समाचारचे संपादक करीत आलेले आहेत.

आज आपला समाज लांब ठिकाणी विखुरत आहे व त्याला एकसंध ठेवण्यासाठी सन्मित्र समाचार सारख्या पत्रकाची विशेष आवश्यकता आहे. यासाठी समाचारचे वर्गणीदार वाढणे आवश्यक आहे. ज्ञातीबांधवांच्या सहकार्याने आज ११००च्या वर असलेले वर्गणीदार निदान अडीच-तीन हजारांपर्यंत वाढले पाहिजेत. सामाचारची तह्रूह्यात वर्गणी रु ५००/- आहे.. यासाठीज्ञातिबांधवांनी अधिकाधिक सहकार्य द्यावे ही विनंती.

सौ. वृंदा मधुसुधन भागवत

संपादिका

सन्मित्र समाचार

द्वारा: सौ स्मिता सुभाष निमकर २२०, एच राजबाग इस्टेट,

खाडिलकर रोड, गिरगाव,

मुंबई ४००००४

दूरध्वनी:- ०२२-२३८२३३६७

सन्मित्र समाचार मासिक
   
जुलै २०१७- वाचा  
जुन २०१७ - वाचा  
मे २०१७ - वाचा  
एप्रिल २०१७ - वाचा  
मार्च २०१७ - वाचा  
फेब्रुवारी २०१७ - वाचा