Offline Page

Curabitur urna montes quis nibh ante scelerisque felis et elit sed. Vitae mauris ut Nullam Donec
जे का रंजले गांजले, त्यांसि म्हणे जो अपुले|
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा||
या भूतदयेच्या विचाराने प्रेरित होऊन देवरुखे ब्राह्मण समाजातील एक वेदमूर्ती कै. शंकर गोपाल मादुस्कर यांनी आपल्या समविचारी सहकाऱ्यांच्या सहाय्याने दि. १५ मार्च १९४९ रोजी देवरुखे ब्राह्मण family  रिलीफ फंड तथा १देवरुखे कौटुंबिक अनाथ निधी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्य्नाच्या सर्व सहकाऱ्यांनीही गरीबीचे चटके सोसले होते.
आपणांस चीमोटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला. अपनांवरून दुसर्याला ओळखत जावे, या उक्तीप्रमाणे त्याच्या मनात दीन dubalyanbaddal  कणव होती. श्री शंकर राव मादुस्कर यांची प्रमुख स्वयंसेवक व कै. शंकर मुकुंद भोले यांची या संस्थेच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
संस्थेची विधिवत स्थापना झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात घरोघरी फिरून मधुकर वृत्तीने निधीसंचायास प्रारंभ केला. ज्ञातीबांधवांकडून या कार्यकर्त्यांना सहकार्य मिळत गेले व भिक्षानिधीच्या रकमेत वाढ होऊ लागली. संस्थेने आकार घेतल्यानंतर दि. २० फेब्रुवारी १९५३ रिजी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर नोंदण्यात आली. या संस्थेत वर्गणीदार सभासद नसत पण प्रतिवर्षी रु २५/- चा भिक्षानिधी जमवून आणणारे ज्ञातीबांधव संस्थेचे  सभासद म्हणून स्वीकारण्यात येईल असे ठरवण्यात आले. दिवसेंदिवस गिरगाव दादरला असलेळू समाजाची वस्ती दूरदूर विखुरत चालली तेव्हा घरोघरी फिरून भिक्षानिधी जमविणे कठीण होऊ लागले.
ज्ञातीतील गरजू व्यक्तींना घरबसल्या काही काम मिळावे म्हणून १९५७ साली संस्थेने एक उद्योग मंदिर सुरु केले. पण पुढे जागेच्या अभावामुळे हा उपक्रम  करावा बंद लागला. संस्था अधिकाधिक समाजाभिमुख व्हावी म्हणून दि. २३ सेप्तेम्बेर १९६१ रोजी संस्थेचे कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्या सभेत नवीन घटना मंजूर करण्यात आले.
गेली ५९ वर्षे संस्था अनाथ, अपंग, वृद्ध निराधार समाज बांधवांची यथाशक्ती सेवा करत आहे. आज संस्थेजवळ केवळ साडेतीन लाख रुपयाचा निधी आहे. व्याजाचे दर झपाट्याने कमी होत चालले आहेत. दिवसेंदिवस समाजाची आर्थिक स्थिती सुधारत असली तरी विभक्त कुटुंब पद्धतीच्या वाढत्या प्रसारामुळे खेडोपाडी पसरलेल्या अनेक निराधार समाजबांधवांना मदतींची आवश्यकता वाढत चालली आहे. आजच्या महागाईच्या दिवसांत हि मदत पुरेशी नाही. पण बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याप्रमाणे हि मदत गरजूंना थोडासा आधार देते.
दि. ३ व ४ जानेवारी १९७६ रोजी संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारने अनाथ निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना नुकतीच सुरु केली आहे.
पण आपल्या देवृखे समाजातील धुरिणांनी आमच्या पूर्वी पंचवीस वर्ष आपल्या समाजातील अनाथ निराधारांसाठी कार्य सुरु केले हे आपल्या समाजाला भूषणावह आहे. हे कार्य सुरूर करणाऱ्या व मिटल्या ओठांनी ते कार्य सातत्याने चालवणाऱ्या शंकरराव मादुस्कारांची त्यांनी मुक्त कंठाने स्तुती केली.
संस्थेकडून दिली जाणारी मदत पूर्णतया धर्मादाय असते. या मदतीला कोणतेही प्रादेशिक किवा परतफेडीचे बंधन नाही. समाजबांधवांना विनंती आहे की आपण आपल्या घरातील जन्मदिवस, श्राद्ध, लग्न, मुंज, वाढदिवस या सारख्या आनंदाच्या प्रसंगी समाजातील वृद्ध निराधारांची आठवण ठेवावी व संस्थेला उदार अंतःकरणाने देणगी द्यावी. गावोगावच्या उत्सव मंडळीनी आपल्या वार्षिक उत्सव खर्चाच्या १० टक्के इतकी रक्कम जरी संस्थेच्या  प्रतिवर्षी देणगी दिली तरी त्यातून संस्थेकडे जवळजवळ एक लाख रुपये प्रतिवर्षी जमा होऊ शकतील. या प्रकारेही आपल्या आराध्य देवतेची उपासना होईल. चेक sansthechya नावानेच लिहावा
अनाथ कौटुंबिक निधी
द्वारा- रामचंद्र गणेश उर्फ रामभाऊ निमकर
        स्वयंसेवक प्रमुख
        फोन:- २३८७१८७३ / २३८२३२९७