देवर्षि प्रकाश

ऑक्टोबर १९२७ मध्ये सुरु झालेले देवर्षि प्रकाश हे त्रैमासिक आज ८० वर्षे अखंडपणे ज्ञातिबांधवांना ज्ञातीमधील घटनांची माहिती देणारा दुवा बनला आहे.

समाजातील सर्व घटकांचे संघटन वाढावे. ठिकठिकाणच्या देवरुखे ब्राह्मण समाजाची परस्परास माहिती व्हावी यासाठी नियातकालीकासारखे अन्य साधन नी हे ओळखून पुण्यातील देवरुखे ब्राह्मण समाजाच्या एका सभेत ज्ञाती विषयक माहिती देणारे त्रैमासिक काढण्याचा ठराव झाला.

की. सीतारामपंत कोकजे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत देवर्षी प्रकाश चालू करण्याचे ठरले. की जनार्दन नारायण तथा बापूराव ढापरे यांनी संपादकीय जबाब्दारो घेतली. सुप्रसिद्ध चित्रकार की. बाजीराव जुवेकर यांनी मुखापृस्थासाठी यथोचित असे चित्र काढून दिले. की. बापूराव मादुस्कर यांनी तेव्हापासून देवर्षी प्रकाशची जबाबदारी पत्करली. ती त्यांनी हयातीपर्यंत सांभाळली.

देवर्षि प्रकाशचे संपादक म्हणून श्री ज ना ढापरे यांनी १९२७ ते १९३५ अशी ७ वर्षे, श्री श्रीधर विष्णू आंबेडकर यांनी १९३५ ते १९७२ अशी ३७ वर्षे, श्री मो वा निमकर यांनी १९७३ ते १९७७ अशी १६ वर्षे व श्री वी न वीरकर यांनी १९८९ ते १९९२ अशी ४ वर्षे समर्थपणे धुरा सांभाळली. सन १९९३ पासून संपादक म्हणून श्री विष्णू शंकर सुद्रिक व करकरी संपादक म्हणून श्री अरुण दत्तात्रय चौघुले देवर्षी प्रकाशचा कारभार समर्थपणे सांभाळीत आहेत.

१९२७ मध्ये सुरु झालेले देवर्षी प्रकाश हे त्रैमासिक १९८६ पर्यंत ठरव्विक व्यक्तींनी काही उद्धेश ध्येय ठेवून चालवले होते. १९८६ साली त्यावेळच्या विश्वस्तांनी देवर्षी प्रकाश त्रैमासिक ट्रस्ट ची स्थापना करून देवर्षी प्रकाशच्या वाटचालीस मोठे क्षेत्र मिळवून दिले आहे व हे त्रैमासिक अखंड पाने चालू ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

देवर्षी प्रकाशच्या त्रेमासिकांत अनेक प्रतिभावंत लेखकांचे लेख, कविता वा अन्य vangmay प्रसिद्ध होत असते. आपल्या गांवोगांवीच्या ज्ञातीसंस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी त्या त्या संस्थांतर्फे होणार्या कार्यक्रमाचे वृत्त पाठवीत असतात.

कालमापनाप्रमाणे जमा-खर्चातील तफावत वाढत राहिली आहे त्यामुळे वेळोवेळी वार्षिक वर्गणी व आजीव सभासद वर्गणी मध्ये वाढ करावी लागली आहे. एवढे करूनही जमाखर्चाची तोंद्मिलावणी करणे बर्याचदा अवघड जाते व अशा वेळेस ज्ञातीबंधावना आग्रहाचे आवाहन आहे कि त्यांनी आपल्या जीवनांतील सुखदुःखाचे क्षणी दे वर्षी प्रकाश सारख्या संस्थांची आठवण ठेऊन सहकार्य करावा.

सदस्यत्व (१५ वर्षांसाठी) रु २५१/-

वार्षिक री ५०/-

संपादक:- श्री विष्णू शंकर सुद्रिक

कार्यकारी संपादक :- श्री अरुण चौघुले

देवर्षी प्रकाश त्रैमासिक ट्रस्ट , पुणे

द्वारा - श्री अरुण ग जोशी, प्रेरणा,

२१ अमर सोसायटी, ४४/एरंडवणे, गुलमोहोर पथ,

पुणे- ४११००४

श्री संतोष ची. जोशी

दूरध्वनी करा.:- ०२०-२५४६८१८२

महिना
फेब्रुवारी २०१७ - वाचा  
फेब्रुवारी २०१८ - वाचा