श्री रत्नेश्वर मंदीर

धामणसे येथील श्री रत्नेश्वर बहुतेक देवरूख्यांचं कुलदैवत आहे. या देवस्थानाचा वार्षिक उत्सव मार्गशीर्ष एकादशी ते पौर्णिमा असा धामणसे येथे संपन्न होतो. मुंबईतही गोवंडी येथे श्री रत्नेश्वर मंदीर आहे. मार्गशीर्ष एकादशीच औचित्य साधून मुंबईतील समस्त देवरुखे बांधवांतर्फे या देवळात शनिवार दि 10 डिसेम्बर 2016 रोजी (मार्गशीर्ष एकादशी) सायंकाळी 6 ते 9 दरम्यान आरत्या, भोवत्या करण्याचा देवरुखे युवाचा मानस आहे. त्या नंतर चहापान व अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपन्न होईल.  अश्या आगळ्या वेगळया कार्यक्रमाला आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती.

 स्थळ : श्री रत्नेश्वर मंदिर, बोरबा देवी मंदिरा जवळ, गोवंडी रेल्वे स्टेशन जवळ, गोवंडी पूर्व, (वाशी बाजूच्या पहिल्या पुलावरून पूर्वकडे येणे)