• जवळील रेल्वे स्टेशन – सावर्डे, चिपळूण
• गावातील देवस्थान – श्री देव लक्ष्मी नारायण
• उत्सवाचा कालावधी – कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशी
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – श्री लक्ष्मीनारायण देवाच्या उत्सवाच्या मध्ये तिसऱ्या दिवशी उकळत्या तेलातून ५ भाजण्याचे वडे हातानी काढायचे. ही परंपरा आज १२५ वर्षांहून अधिक काळ चालू आहे. हा मान फक्त कुडलीतील निमकर यांना आहे. श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती नदीतून वाहत आली. ती कोण्या कर्त्या पुरुषाच्या स्वप्नात आली. त्याने नदीतून मूर्ती काढून देऊळ बांधले अशी दंतकथा सांगतात. गोकुळाष्टमी व शिवरात्रीचा उत्सव, पारंपरिक शिमगा.
• गावकीची देवस्थाने – श्री रवळनाथ देव
• गावातील लोकवस्ती – साधारण ६००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत, पाटाचे पाणी असल्याने नारळ-सुपारी इ.
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – सुमारे ४ किमी खाडी किनारा, बंदर, बाजारपेठ. गाव नैसर्गिकरित्या तीन डोंगरांनी कुडलेला आहे म्हणून कुडली. गावामध्ये नदी असून तिच्या दोन्ही बाजूस असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेला आहे.
• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर, पाट
• सीमेवरील गावे – जांभारी, माठल व आंबेरे ही गावे व चौथ्या बाजूला जयगड खाडी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.