About Us

देवरुखे ब्राह्मण

हे हिंदू ब्राह्मण समुदाय यापैकी असून पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण विभागातले आहेत.

"देवरुखे" यांची गणना महाराष्ट्राच्या ब्राह्मणापैकी चार मुख्य शाखात होते. अर्थात अन्य शाखा म्हणजे देशस्थ, चित्तपावन, कऱ्हाडे. महाराष्ट्रीयन ब्राह्मण हे पंचद्रविड ब्राह्मणापैकी आहे. पंचद्रविड ब्राह्मणाच्या अन्य प्रशाखा तमिळ, तेलंगी, कर्नाटकी व गुजराती या होत.  देवरुखे ब्राह्मण शाकाहारी आहेत.

देवरुखे ब्राह्मणांसाठी १९३१ आणि १९६१ साली जनगणना करण्यात आली होती. १९६१ सालच्या जणगणने प्रमाणे देवरुखे ब्राह्मणांची संख्या एकूण १५००० होती. सध्या हि संख्या १ ते १.५ लाख  असण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनसंख्येकडे बघता हा आकडा शून्यातच गणला जाऊ शकतो.

या कारणामुळे देवरुखे ब्राह्मण, आपली समृद्ध परंपरा आणि अस्तित्व असूनही महाराष्ट्र राज्यांत आपले हवे तसे स्थान मिळवण्यास असमर्थ राहिले. दोन्ही वेळेच्या जनगणना सिद्ध करतात कि देवरुखे ब्राह्मणांची साक्षरता टक्केवारी ९४ टक्के असून यांत स्त्री साक्षरता ८५ टक्के आहे. जीवनमर्यादा प्रमाण सुद्धा राष्ट्रीय प्रमाणांहून जास्त आहे.

व्यवसायिक दृष्ट्या आता शिक्षणामुळे  सर्व क्षेत्रात काम करताना आढळतात.  

आमचे ध्येय

देवरुखे ब्राह्मण समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि परस्पर सहकार्य यांना प्रोत्साहन देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. समाजातील विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू बांधवांच्या विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि गरजूंना मदत उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

तसेच समाजाची परंपरा, इतिहास, रूढी आणि संस्कृती यांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, ऐक्य व बंधुभाव वृद्धिंगत करणे आणि प्रत्येक सदस्याला विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. डिजिटल माध्यमातून समाजाला जोडणारे, माहितीची देवाणघेवाण सुलभ करणारे आणि प्रगतीला चालना देणारे सक्षम, विश्वासार्ह व सर्वसमावेशक व्यासपीठ निर्माण करून प्रगत समाज घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

यासोबतच समाजातील उपक्रमांना चालना देऊन नव्या पिढीमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि सहकार्याची भावना विकसित करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

आमची ध्येयदृष्टी

“ परस्पर सहाय्ये संहती कार्यसाधिका ”

देवरुखे ब्राह्मण समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक मूल्ये आणि वारसा जपत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे, परस्पर सहाय्य व सहकार्याची भावना दृढ करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे, ही देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवलीची ध्येयदृष्टी आहे.

समाजातील विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू बांधवांसाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम राबवून प्रत्येकाला प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे, तसेच नव्या पिढीमध्ये संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती कर्तव्यभावना रुजवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.

“परस्पर सहाय्ये, समाजाची उन्नती!”

एकसंघ, सुसंस्कृत, स्वावलंबी आणि प्रगत समाजाची निर्मिती करून आपल्या परंपरेचा वारसा पुढील पिढीकडे अभिमानाने सुपूर्द करण्यासाठी देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली सदैव कटिबद्ध आहे.

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख "जाती पुराण " मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे, विशेष करून  विश्वदर्श ग्रंथ ज्ञातीप्रमुख. ज्ञातीदिपिका इत्यादी (संदर्भ पीपल ऑफ इंडिया, पॉप्युलर प्रकाशन तर्फे दोन खंडांमध्ये प्रकाशित द anthropological  सर्वे ऑफ इंडिया. वर्ष: २००४, आईएसबीएन : भाग १ : ८१-७९९१-१००-४, भाग २ : ८१-७९९१-१०१-२, पृष्ठ ४७४ पासून ४९०.)

देवरुखे ब्राह्मणांचा प्रथम उल्लेख शतप्रश्नकल्पलता या सन १६९० मध्ये लिहिलेल्या ग्रंथात आढळतो. या ग्रंथातील चितळे भट्ट प्रकरणातील ब्राह्मणांचा उल्लेख देवरुखे ब्राह्मण असा केला आहे. देवरुखे ब्राह्मणांची मूळ उत्पत्ती कोठून झाली या बद्दल एकमत नाही. काही म्हणतात साताऱ्याजवळील देवराष्ट्र ह्या संस्थानाच्या राज्यात युद्धात पराभव झाल्यामुळे तेथून निघाले आणि कोकणात आले ते देवरुखे. काही म्हणतात "रुखे" हा "रूपे" ह्या शब्दाचा अपभ्रंश असून "देवरुखे" म्हणजे "देवाचे रूप" असा त्याचा अर्थ आहे. देवरुख हे गाव संमेश्वर तालुक्यात (जिल्हा रत्नागिरी) आहे. येथे रत्नागिरी जिल्ह्याचा सन  १८८० च्या गॅझेटियर मधील पुढील उल्लेख विचारात घेण्याजोगा आहे. "Devrukhas with a strength of 5727 souls and their headquarters at Devrukh in Sangmeshwar are found in considerable numbers all over Ratnagiri Sub-Division and occasionally all parts of the Distrct except Malavan and Devgad ......" गॅझेटिअर मधील लिखाण कागदोपत्री पुराव्यावर आधारीत असते. तेव्हा देवरुखे हा शब्द स्थानवाचक आहे याला पुष्टी मिळते.

इसवी सनापूर्वी दीड हजार वर्षांपासून अरब लोकांचे हिंदुस्थानाशी व्यापार संबंध होते. त्यांची व्यापारी देवाण घेवाण कोकणातील सोपारे, ठाणे, चौल , दाभोळ, जंजिरा इत्यादी निवडक बंदरातून चाले. कोकणात इसवी सन १४०० पर्यंत वस्तीच नव्हती. फक्त तुरळक वस्ती बंदर भागात समुद्रकाठी होती. त्यामुळे कोकणात राज्यपद्धती नव्हती. सन १५०२ च्या सुमारास त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी जमिनीची मोजणी करून त्या लागवडीस आणण्याची योजना आखली. अनेक जणांना जमिनी कसण्यासाठी दिल्या व ते मालकी हक्क वंश परंपरागत होते. या शिवाय जकाती व अन्य वसुली (म्हणजे जी कामे परस्पर विश्वासावर अवलूंबून असतात अशी कामे) या वर आधारित नोकऱ्या ब्राह्मणांना दिल्या. मराठे सरदार व जहागीरदार यांनी कोकणात येताना त्यांची धार्मिक कृत्ये नियमित चालावीत म्हणून घाटावरील ब्राह्मणांना बरोबर आणेल. त्यांच्या चरितार्थासाठी आपल्या कब्ज्यात जमिनी लावून दिल्या. थोडक्यात भिक्षुकी, नोकरी व शेती यांच्या साहाय्याने ब्राह्मण कुटुंबे कोकणात स्थायिक झाली. जे ब्राह्मण देवरुख मार्गे आले आणि  संगमेश्वर , रत्नागिरी , गुहागर, चिपळूण या तालुक्यात स्थायिक झाले ते देवरुखे ब्राह्मण म्हणून ओळखले जाऊ लागले, अशीही एक वंदता आहे.

देवरुखे ब्राह्मणाच्या वसाहती समुद्रकाठी नसून मध्य भागातील डोंगराळ भागात आहेत. देवरुखे ब्राह्मणांनी  शेतीच्या सोयीस उपयोगी पडतील अशा जमिनी मुबलक पाण्याची सोय बघून संपादित केल्या व शेती हा आपला प्रमुख व्यवसाय म्हणून स्वीकारला.

देवरुखे  ब्राह्मण परिश्रमी, अगत्यशील. सौम्य, आणि काटकसरी असतात. ते मनमिळावू असतात, विसाव्या शतकापूर्वी हे एक बंदिस्त समूह असे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की देवरुखे  ब्राह्मण आपल्या प्रगती साठी स्वयंस्फुर्तपणे पुढे येतात. देवरुखे  ब्राह्मणाद्वारे झालेल्या वेगवेगळ्या संस्थांची स्थापना हे दर्शवते, की शिक्षण, वित्त आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पैकीच एक संस्था “विद्यार्थी सहाय्यक संस्था” आपल्या गौरवशाली परंपरेची १२५ वर्ष पूर्ण करत आहे.आपल्या जातीची सेवाभावना उच्च कोटीची आहे.  

असे दिसून येते की मुस्लीम लोकांच्या आक्रमणामुळे, शांतता  आणि सुरक्षेच्या दृष्टीने देवरुखे  ब्राह्मण रत्नागिरी जिल्ह्यातील आंतरिक क्षेत्रात गेले जिथे नदीचे पाणी विपुल प्रमाणात आहे. असे म्हणणे वावगे होणार नाही की देवरुखे ब्राह्मण हे जयगड खाडी आणि शास्त्री नदीच्या बाजूने असलेल्या ९८ गावांमधून वसलेले आहेत. आज देवरुखे ब्राह्मण रायगड आणि रत्नागिरी, मुंबई आणि उपनगरांत, महाराष्ट्राच्या अनेकानेक भागात आणि गुजरात व मध्याप्रदेशांत आहेत. यापैकी काही शिक्षण नोकरीनिमित्त अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑष्ट्रेलिया व जगात विविध ठिकाणी   स्थायिक झाले आहेत.

वर्तमान स्थिती:

व्यक्तिगत आणि सामुहिक रित्या केलेले संघर्ष आणि सतत प्रयत्नांमुळे आता देवरुखे ब्राह्मण जातीला उत्कर्षाचे आणि प्रगतीचे दिवस दिसत आहेत. साक्षरता टक्केवारी संगणक साक्षरता आणि स्त्री साक्षरता मिळून, या जातीची शैक्षणिक आणि वित्तीय स्थिती अन्य कोणत्याही जातीपेक्षा प्रगतीशील आहे. परिवार नियोजन करणे, आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे व भविष्य सुधारणे यासाठी वित्तीय योजना करणे असे सद्गुण वाखाणण्याजोगे आहेत. या कारणांमुळे यांचे जीवनस्तर कमालीचे उंचावले आहे. 

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.