° जवळील रेल्वे स्टेशन -रत्नागिरी
° गावातील देवस्थान – श्री रत्नेश्वर
° उत्सवाचा कालावधी -मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ते पौर्णिमा
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – मंदिरात श्री रवळनाथाचीही स्थापना आहे त्यामुळे शिव व विष्णू यांचे एकत्रित आशीर्वाद भक्तांना मिळतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीं ची पालखी मानकरी ग्रामस्थांच्या घरी व काही सार्वजनिक ठिकाणी जाते. उत्सवाची सुरुवात ग्रामसंकीर्तनाने झाल्यावर पाचही दिवस आरत्या, भोवत्या व कीर्तन असा पारंपारिक कार्यक्रम असतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी महाप्रसाद, रात्री नाट्यप्रयोग व नंतर लळीताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होते.
सध्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू असून नवीन भव्य रुपात मंदिर उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्व भक्तांना सढळ हस्ते देणगीचे आवाहन करण्यात येत आहे.
श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट, बँक ऑफ इंडिया,
खाते क्र.: १४२७१०२०००००४४२८,
IFSC: BKID०००१४२७
° गावकीची देवस्थाने – रवळनाथ, चणकी, महालक्ष्मी, मानाई, कालिका, जाकादेवी
° गावातील लोकवस्ती – साधारण २५००
° गावातील मुख्य व्यवसाय -शेती, बागायत
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – निसर्गरम्य गाव असून गावातून सोमगंगा नदी वाहते. त्या नदीच्या पाण्यानेच श्री रत्नेश्वराची पूजा व जलाभिषेक केला जातो.
° पाण्याचे स्त्रोत -विहीर, पाठाचे पाणी
° सीमेवरील गावं – ओरी, खरवते, नेवरे, निवेंडी, चाफे
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.