• जवळील रेल्वे स्टेशन – सावर्डे, चिपळूण
• गावातील देवस्थान – श्री सिद्धिविनायक देवस्थान
• उत्सवाचा कालावधी – माघ कृष्ण चतुर्थी आणि पंचमी
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा –
मंदिराची स्थापना कधी करण्यात आली हे माहीत नाही. परंतु १७६५ मध्ये पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर [तारीख अस्पष्ट] आणि सन १९६६ या वर्षांमध्ये अनुक्रमे दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर कौलारू पद्धतीचे असून बहुतेक लाकडी बांधकामाचे आहे. काळानुरूप त्याची डागडुजी करण्यात आली आहे. प्रतिवर्षी उत्साहात हा दोन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
पहिल्या दिवशी पुण्याहवाचन, श्रींची पूजा, आरती, जन्मोत्सव कीर्तन, उपवास फराळ तसेच संध्याकाळी सायंपूजा, आरती, जेवण. मग ढोल-ताशा आणि टिपऱ्यांच्या गजरात छबिना सुरू होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रींची पूजा, आरती, त्यानंतर महाप्रसाद; संध्याकाळी सहस्रावर्तने, सांजपूजा, आरती, छबिना, संगीत कार्यक्रम, भजने, नाटक, तत्सम कार्यक्रम; त्यानंतर लळीत कीर्तन असे उत्सवाचे स्वरूप आहे.
• गावकीची देवस्थाने – श्री सुखाई देवी (सोंबा, जोगाई, सुकाई, मानाई, काळकाई, चणकी)
• गावातील लोकवस्ती – साधारण ९००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत, कोकण उत्पादने
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य –
गावाला लागूनच कापशी (कश्यपी) नदी वाहते. आजूबाजूच्या परिसरात शेतीचे मळे आहेत. गावातील काही लोकवस्ती डोंगरमाथ्यावर, तर काही डोंगरउतारावर, तर काही खोऱ्यात वसलेली आहे. नजर जाईल तिकडे हिरवी राने पाहायला मिळतात. गावाच्या पश्चिमेला नदीपलीकडे गुहागर तालुक्याची हद्द सुरू होते.
• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर, पाट, निसर्गनिर्मित झरे
• सीमेवरील गावं – पुर्ये, वीर, तोंडली, मूर्तवडे, कापशी नदी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.