° जवळील रेल्वे स्टेशन -सावर्डे, चिपळूण
° गावातील देवस्थान – श्री देव लक्ष्मीनारायण
° उत्सवाचा कालावधी -कार्तिक वद्य दशमी ते द्वादशी
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – श्री देव लक्ष्मीनारायणाची मूर्ती २०० वर्ष जुनी आहे आणि अजूनही उत्तम रेखीव आहे. गेली २०० वर्षे चालत आलेली उत्सव परंपरा आजही अविरत सुरु आहे. तसेच उत्सवात १७५ वर्षे जुनी संगीत नाटकं सादर करण्याची परंपरा.
° गावकीची देवस्थाने – श्री चणकी, काळकी, लकमदेव आणि चाळकोबा
° गावातील लोकवस्ती – साधारण ७००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत, नारळ-सुपारी
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – गावात एकदोन ठिकाणी कातळ शिल्पे आहेत आणि घनदाट झाडी.
पूर्वी वाघमाळ व चांद्रमाळ असे सपाट माळरान असलेले दोन भाग एकत्र होते. इ.स.१७५१ ते १७६० च्या दशकात नानासाहेब पेशव्यांचे कारकिर्दीत जमीन मोजणी झाली. तेव्हा चांद्रमाळेची फाळणी होऊन , चिंद्रवळे, दोडवली आणि वाघमाळेचा वाघांबे असे तीन गाव झाले.
° पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, धरण
° सीमेवरील गावं – मुसलोंडी, उमराठ, चिंद्रवळे, दोडवली, करंदे
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.