° जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी
° गावातील देवस्थान – श्री लक्ष्मी नारायण
° उत्सवाचा कालावधी -कार्तिक शुद्ध एकादशी ते चतुर्दशी
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पांडव कालीन मंदिर रचना, सन १९१३ मध्ये मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार झाला तर दुसरा जीर्णोद्धार सन १९७२ साली झाला. क वर्ग पर्यठन स्थळ, उत्सव समाप्तीला कीर्तन, दहीकाला, छबिना, नाटक
° गावकीची देवस्थाने – रवळनाथ, नवालई, सोमेश्वर, सोमजाय, काळकाय, मानाय, जुगाय, वरदान, चाणकाय, वाघजाय
° गावातील लोकवस्ती – सुमारे ५०००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत, खंडाळी, मोठी बाजारपेठ असल्याने अनेक उद्योग सुरु झाले आहेत
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – श्री आदित्यनाथांचं प्राचीन मंदिर, दोन डोंगरांच्या मधून लांब नदी वाहते व ती जयगड खाडीला मिळते. गाव आठ गावांनी वेढलेले असून त्याला अनेक पायवाटा आहेत. वाठ देणारा गाव म्हणून वाटद नाव पडलं असं म्हटलं जात.
° पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, नळ पाणी
° सीमेवरील गावं – गडनरळ, कोळिसरे, कळझोंडी, वरवडे, चाफेरी, कांबळे- लावगण पन्हळी, जयगड खाडी
° जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी
° गावातील देवस्थान – श्री खंडाळेश्वर देवस्थान
° उत्सवाचा कालावधी -शिवरात्र, माघ वद्य त्रयोदशी पासून त्रिरात्र उत्सव
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पुरातन मंदिर. कै तातो बल्हाळ जोशी यांनी सन १८९० साली मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. फुणगूस चे पुराणिक यांचे कुलदैवत. गाय पान्हा सोडून दगडावर दुधाचा अभिषेक करताना गुराख्याने पाहिले व त्याने त्या दगडावर कोयतीचा घाव घातला. ते शिवलिंग होते. लिंगावर कोयतीच्या घावाची मोठी खाप राहिली म्हणून खंडाळेश्वर नाव पडले. अशी दन्तकथा.
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – खंडाळा हे वाटद गावाचाच एक
भाग आहे. कातळ भाग असल्याने झाडी कमी. मुख्य बाजार पेठ, जयगड बंदर, गणपतीपुळे, मालगुंड इत्यादीचे केंद्रस्थान.
° पाण्याचे स्त्रोत -विहीर, नळपाणी योजना
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.