वाटद-खंडाळा

  • Home
  • वाटद-खंडाळा

वाटद-खंडाळा, ता. जि. रत्नागिरी

°  जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी

°  गावातील देवस्थान – श्री खंडाळेश्वर देवस्थान

°  उत्सवाचा कालावधी -शिवरात्र, माघ वद्य त्रयोदशी पासून त्रिरात्र उत्सव

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पुरातन मंदिर. कै तातो बल्हाळ जोशी यांनी सन १८९० साली मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. फुणगूस चे पुराणिक यांचे कुलदैवत. गाय पान्हा सोडून दगडावर दुधाचा अभिषेक करताना गुराख्याने पाहिले व त्याने त्या दगडावर कोयतीचा घाव घातला. ते शिवलिंग होते. लिंगावर कोयतीच्या घावाची मोठी खाप राहिली म्हणून खंडाळेश्वर नाव पडले. अशी दन्तकथा.

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – खंडाळा हे वाटद गावाचाच एक 
भाग आहे. कातळ भाग असल्याने झाडी कमी. मुख्य बाजार पेठ, जयगड बंदर, गणपतीपुळे, मालगुंड इत्यादीचे केंद्रस्थान.

°  पाण्याचे स्त्रोत -विहीर, नळपाणी योजना