• जवळील रेल्वे स्टेशन – भोके, रत्नागिरी
• गावातील देवस्थान – श्री लक्ष्मीकांत, श्री रत्नेश्वर
• उत्सवाचा कालावधी – कार्तिक शु. एकादशी ते त्रयोदशी – श्री लक्ष्मीकांत, महाशिवरात्र – श्री रत्नेश्वर
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपरिक उत्सव
• गावकीची देवस्थाने – रखुमनाथ, नवलाई, झोलाई, वाघजाई, जाकादेवी, सोनचाकळी
• गावातील लोकवस्ती – साधारण २४००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – निवळीचा सुप्रसिद्ध धबधबा. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. पावसाळ्यात मात्र दुरूनच सौंदर्य न्याहाळलेले अधिक चांगले. सदर धबधबा थोडीसुद्धा माती नसलेल्या कातळावरून पावसात कोसळतो तेव्हा निव्वळ सफेद स्वच्छ पाणी गावाच्या नदीत मिसळून जाते. नदीचे पाणी निवळ असते म्हणून गावाला निवळी नाव पडले असे म्हणतात.
• पाण्याचे स्रोत – विहीर, नदी, काही ठिकाणी बोअरवेल
• सीमावरील गावं – करबुडे, भोके, हातखंबा, बानवडी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.