कोळीसरे

कोळीसरे, ता. जिल्हा रत्नागिरी ४१५६२०

• जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी

• गावातील देवस्थान – श्री लक्ष्मीकेंशव, श्री रत्नेश्वर

• उत्सवाचा कालावधी – कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – श्री लक्ष्मीकेंशव देवाची चतुर्भुज मूर्ती शालिग्राम शिळेची असून कारागिरीचा अप्रतिम नमुना असून अतिशय नितळ व तेजस्वी आहे. मूर्तीची उंची सुमारे पाच फूट असून शंख चक्रगदापद्म हातामध्ये असून अंगावर निरनिराळे अलंकार व यज्ञोपवीत कोरलेले आहेत. प्रभावळीत दशावतार स्पष्टपणे कोरलेले दिसतात. मूर्तीचे उजवे बाजूस जय व गरुड तर डावे बाजूस लक्ष्मी व विजय यांच्या लहान पण रेखीव मूर्ती आहेत. इतिहास तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे ही मूर्ती इ.स. १४७० ते १५०३ या काळात, राष्ट्रकूट घराण्यातील राजे विष्णुभक्त असल्याने उत्तम मूर्ती घडवून विष्णूची मंदिरे बांधीत असत. पुढे कालांतराने परकीयांच्या मूर्तीभंजनाच्या भीतीने मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून जिऱ्ये ही मूर्ती त्याकाळी स्वप्नदृष्टांताप्रमाणे कोल्हापूरच्या रंकाळा तलावात सापडली. तिथे ती बुडवून ठेवली असावी असा कयास आहे. स्वप्नदृष्टांताप्रमाणे तिची स्थापना कसपुरी (ता. रत्नागिरी) येथे करण्यासाठी गड्यांनी ती डोळ्यापासून नेत असताना पुढे कोळीसरे येथे आल्यावर मूर्तीजड होऊन हलविता न आल्याने नियोजित ठिकाणी नेणे अशक्य झाले. शेवटी ही मूर्ती कोळीसरे येथेच स्थापित केली. त्या वेळचे सरपंच गाव (मुंबईताबा) महालाचे २४ गावाचे महालकरी के. भानुप्रभू तेरदेसाई कोळीसरे येथे राहत होते. यांचे पुढाकाराने इ.स. १४१० साली मूर्तीच्या सुरक्षिततेचा विचार करून, विजापूरचे कारागिर आणून गर्भगृहाच्या ३ फूट जाडीच्या भिंतींच्या १४-१६ फूटाचा पेटी बंद गाभारा बांधून त्यावर त्रिशूल गोलघुमट बांधून ठेवला व मूर्तीची स्थापना केली. आजही हे बांधकाम निसर्गाशी टक्कर देत उभे आहे. हे बांधकाम करताना पायथ्याशी झरा लागला जो तीर्थ म्हणून संबोधले जाते. पावस येथील सत्गुरु स्वामी स्वरूपानंद हे या झऱ्याचे पाणी पिण्यासाठी वापरीत होते व ते नेण्यासाठी एक स्वतंत्र भक्त नेमला होता. उत्सव पूजा, छबिना, आरत्या, सवाया, नाटक इत्यादी पारंपरिक पद्धतीने होतो.

• गावकची देवस्थाने – नरबळदेव, धामणदेव, चौकर्णी, जाकादेवी, त्रिमुखी, चणकी

• गावातील लोकवस्ती – सुमारे ५०००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – शास्त्री खाडीवरील कोळीसरे बंदर. श्री लक्ष्मी केशव, श्री रत्नेश्वर मंदिर परिसर हा चारही बाजूंनी डोंगर असलेला नयनरम्य परिसर असा आहे.

• पाण्याचे स्रोत – पाट

• सीमावरील गावं – आगरनरळ, कळझोंडी, वाडद, गडनरळ, जयगडची खाडी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.