ह्यांचा जन्म १८६७ साली कोकणातल्या आंबेड बुद्रुक गावातील. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना वैधव्य आले त्यामुळे त्यांना कोकणातून घरदार सोडून कामानिमीत्त मुंबईस येणे भाग पडले. मुंबईत येऊन त्यांनी १९०० ते १९२२ या काळात खानावळ व्यवसाय मोठया हिमतीने व वैशिष्टपूर्ण रीतीने केला. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या "जुन्या आठवणी" या पुस्तकात त्यांनी बाईंच्या मुंबईतील गिरगाव मुगभाटतील खानावळीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाईंनी त्याकाळी देवरुखे ब्राह्मण समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी रु ३५,००० ठेवले होते, पुढे त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नावाचा चंद्रभागाबाई ट्रस्ट १९४० साली अस्तित्वात आला. आजही त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती विदयार्थ्यांना दिली जाते. अश्या कर्तृत्ववान व दानशूर बाईंचे १९२३ रोजी निधन झाले.