यांचा जन्म १७ जुलै १९३१, मडगांव गोवा येथे झाला. त्यांनी अमेरिकेतील विश्वविद्यालयातून B.Sc. (Agronomy) and M.Sc.(Biochemistry) च शिक्षण घेतलं. त्यानंतर भारतात येऊन त्यांनी निंबकर सीड्स प्रा लि , निंबकर ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट , नीरा व्हॅली जेनेटिक्स लिमिटेड या कंपन्यांची स्थापना केली. शेती व मेंढीपालन या विषयातील जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून नावलौकिक. मॅफको कंपनीचे चेअरमन व आम्रखंड व एनर्जी या उत्पादनाचे प्रणेते. चिकित्सक, निर्भीड, स्पष्टवक्ते, कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व.