शिरगाव (भिलाड) येथे जन्म. त्याकाळी सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते. लोकोपयोगी कामासाठी, प्रत्यके व्यक्तीकडून एक एक पैसा गोळा करून १६ ऑक्टोबर १८९९ रोजी "पैसाफंड" या संस्थेची स्थापना केली. ह्या चळवळीची दखल खुद्द लोकमान्य टिळक यांनी घेतली होती. अशी चळवळ यशस्वी होणार नाही ह्या लोकमान्यांच्या मतावर अंताजीपंत काळे खुद्द लोकमान्यांशी संवाद साधून त्यांना आपली विचचारसरणी पटवून दिली. नंतर केसरी मध्ये लेख लिहून लोकमान्यांनी "पैसाफंड" चळवळीचा पुरस्कार केला. पुढे एप्रिल १९०८ मध्ये तळेगाव (पुणे) येथे काळे यांनी "पैसाफंड" काच कारखाना यशस्वीपणे उभा केला. हे पाहून जिद्दीचा लढवय्या म्हणून लोकमान्य टिळक यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. गोरगरीबांच्या पैशातून उभा राहिलेला हा काच कारखाना महाराष्ट्राला ललामभूत ठरला आहे. महाराष्ट्रभर पैसाफंड वाले काळे म्हणून अंताजीपंत प्रसिद्ध पावले.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.