मोरेश्वर गजानन पिंपुटकर, I.C.S. (१९१६ – १९८६)

मोरेश्वर गजानन पिंपुटकर, I.C.S. (१९१६ - १९८६)

पिंपुटकर हे मूळचे उंबरगावचे. वयाच्या सातव्या वर्षीच पितृछत्र हरपल्यामुळे चुलते व मामा यांचेकडे पदवीपर्यंचे  शिक्षण झाले. BA उत्तमरीत्या पास झाल्यावर ICS च्या परीक्षेसाठी इंग्लड ला गेले. १९४० मध्ये देवरुखे ब्राह्मण समाजातील पहिले व ब्रिटिश राजवटीतील अखेरचे ICS ऑफिसर म्हणून मुंबईत परतले. सरकारी नोकरीत अनेक महत्वाच्या हुद्द्यांवर त्यांनी अलौकिक कामगिरी केली. ते गोध्रा येथे कलेक्टर होते,  तर काहीकाळ अहमदाबाद येथे फूड कमिशनर होते. मुंबई महानगरपालिकेचे ते १९६० ते १९६२ काळात आयुक्त म्हणून कार्यरत होते. कठोर, शिस्तप्रिय आणि कणखर प्रशासक म्हणून मा. मोरारजीभाई देसाई यांनी त्यांना गौरवले होते. काही काळ ते पश्चिम बंगालच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून तर काही काळ दिल्लीचे हंगामी राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.