केशवराव भोळे मूळचे अमरावतीचे. डॉक्टरीचे शिक्षण चालू असताना संगीत साधनेकडे वळले. डॉक्टरीचे शिक्षण राहून गेलं, परंतु साहित्य, संगीत, नाट्य व सिनेसृष्टीत ते शिखरावर पोहोचले. केशवराव भावगीत या गायन प्रकारचे जनक. १९३४ पासून प्रभात फिल्म कंपनीचे संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अमृत मंथन, संत तुकाराम, कुंकू, संत ज्ञानेश्वर, संत सखू, रामशास्त्री असे अनेक चित्रपट केशवराव यांच्या संगीताने अजरामर झाले.
केशराव भोळे यांचे ख्यातनाम गायिका व नाट्य अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचेशी विवाह झाला. नाट्यमन्वंतर संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील भूमिकेने १९३३ साली वयाच्या २० व्या वर्षी संगीत रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यानंतर अनेक नाटकातून त्यांनी भूमिका केल्या व त्यांनी गायलेली अनेक पदे आजही रसिकांच्या समरणात आहेत. लता मंगेशकर पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार , अशा अनेक पुरस्कारांनी ज्योत्स्नाबाईंना सन्मानित करण्यात आले होते.